Ad will apear here
Next
‘कृत्रिम गर्भधारणा उपचारांची यशस्वितता वाढली’
ओएनपी लीला रुग्णालयातील ‘आयव्हीएफ’ विभागाचे उद्घाटन करताना आमदार लक्ष्मण जगताप.या वेळी डॉ. अविनाश फडणीस व डॉ. अमिता फडणीस उपस्थित होते.
पुणे : ‘मूल होण्यासाठीची नैसर्गिक प्रक्रियाही ३० टक्के वेळाच यशस्वी ठरते. त्यामुळे ‘आयव्हीएफ’ उपचारांच्या आधारे होणाऱ्या कृत्रिम गर्भधारणेला असलेल्या काही मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. परंतु गेल्या पंचवीस वर्षांत वंध्यत्त्वावरील उपचारांची यशस्वितता १० ते १२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. विशेषतः ज्या जोडप्यांमधील वंध्यत्त्व स्त्रीबिजाशी निगडित समस्येमुळे असते त्यांच्या वंध्यत्त्व निवारणात निश्चितच खूप सुधारणा झाली आहे.’ असे मत प्रसिद्ध स्त्रीरोग व कृत्रिम गर्भधारणा तज्ज्ञ डॉ. अविनाश फडणीस यांनी व्यक्त केले.

पिंपळे-सौदागर येथील ओएनपी लीला रुग्णालयातील ‘आयव्हीएफ’ विभागाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात ओएनपी रुग्णालयांचे संस्थापक डॉ. अविनाश फडणीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ओनएनपीच्या संस्थापिका व संचालिका डॉ. अमिता फडणीस, जीके असोसिएटसचे विनोद चंदवानी, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीना साठे, डॉ. अमित पाटील या वेळी उपस्थित होते. 

डॉ. फडणीस यांनी १९९३ मध्ये पुण्यात पहिल्या आयव्हीएफ उपचार केंद्राची स्थापना केली. मुंबईच्या बाहेर पश्चिम भारतातील हे पहिले आयव्हीएफ केंद्र ठरले. या उपचारांमध्ये झालेल्या सुधारणांबद्दल डॉ. फडणीस म्हणाले, ‘एम्ब्रियोलॉजी’च्या क्षेत्रातील उच्च दर्जाची कौशल्ये गेल्या पंचवीस वर्षांत अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध झाली असून या उपचारांसाठीची जवळपास ९९ टक्के उपकरणे व औषधे देशात बनतात व वितरित होतात. पूर्वीच्या काळी पहिली संतती स्त्री २० ते २१ वर्षांची असताना होत असे. हल्ली जोडप्यांचे विवाह उशीरा होतात किंवा मूल होऊ देण्याचा निर्णय उशीरा घेतला जातो आणि साधारणतः स्त्री २९ ते ३२ वर्षांची असताना संतती व्हायला हवी यासाठी जोडप्यांचे प्रयत्न सुरू होतात. या कारणांमुळे आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढली आहे, परंतु वंध्यत्त्वावरील उपचारांची यशस्वितताही १० ते १२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.’

‘संतती होण्यासाठी स्त्रीबिज, पुरूषबिज तसेच गर्भाशयाची पिशवी आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या नलिका यांचे कार्य व्यवस्थित चालणे महत्त्वाचे ठरते. शिवाय जोडप्याचे शारीरिक संबंध सुरळित असणेही महत्त्वाचे असते. अनेकदा डॉक्टरांच्या साध्या सल्ल्याने, विशेष उपचार न करताही त्यातील अडथळे दूर होऊन वंध्यत्त्वाची समस्या सुटू शकते’, असेही डॉ. फडणीस यांनी नमूद केले.

डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, ‘ओएनपी लीला रुग्णालयात सरसकट सर्व जोडप्यांना आयव्हीएफ उपचार दिले जात नसून वंध्यत्त्वाची समस्या घेऊन आलेल्या जोडप्यांचा प्रश्न पूर्णतः समजून घेऊन त्यांना गरजेचे असलेले उपचार केले जातात. आमच्याकडे असलेली स्त्रीरोगतज्ज्ञ व एम्ब्रियोलॉजिस्टची अतिशय अनुभवी व निष्णात टीम ही आमची सर्वांत जमेची बाजू आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZROBL
Similar Posts
‘ओएनपी’ रुग्णालयातर्फे मोफत सत्राचे आयोजन पुणे : ‘गरोदर स्त्रीने काय खावे आणि काय टाळावे, गर्भवतींना व्यायामाचा कसा फायदा होतो, गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत कशी काळजी घ्यावी, असे विविध प्रश्न गर्भवतींच्या मनात असतात. अशा सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी ऑयस्टर अँड पर्ल (ओएनपी) रुग्णालयातर्फे एका खास सत्राचे आयोजन केले आहे. या सत्रासाठी गरोदर
गर्भवती महिलांसाठी ‘प्रेगोदीवा’चे आयोजन पुणे : गर्भवतींच्या कौतुक सोहळ्याला आधुनिक स्वरूप देत ओएनपी रुग्णालयाने ‘प्रेगोदीवा’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गर्भवती महिलांना चक्क ‘रँप वॉक’ करण्याची संधी मिळणार आहे. बाळंतपण सुरळीत व्हायच्या दृष्टीने गर्भारपणात केल्या जाणाऱ्या ‘बेली डान्स’ला सध्या प्रचंड लोकप्रियता प्राप्त
ओएनपी रुग्णालयात विविध उपक्रम पुणे : नुकत्याच झालेल्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त ऑयस्टर अँड पर्ल (ओएनपी) रुग्णालयातर्फे महिनाभर विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
तीन महिन्यांच्या बालकावर अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वी पुणे : केवळ तीन महिन्यांच्या आणि साडे चार किलो वजनाच्या बालकावर अत्यंत अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यात येथील ‘ऑयस्टर अँड पर्ल’ (ओएनपी प्राईम) रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language